जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:59 IST2021-02-20T04:59:42+5:302021-02-20T04:59:42+5:30
श्रीगोंदा : माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य सदाशिव भिकाजी पाचपुते (वय ६७, रा. काष्टी, ...

जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांचे निधन
श्रीगोंदा : माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य सदाशिव भिकाजी पाचपुते (वय ६७, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) यांचे शुक्रवारी दुपारी सव्वादोन वाजता पुणे येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.
सदाशिव पाचपुते यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र फुफ्फुसातील संसर्ग आटोक्यात न आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे बबनराव पाचपुते, दत्तात्रय पाचपुते हे दोघे बंधू, सुनंदा पत्नी, साजन, सुदर्शन ही दोन मुले, सोनाली, सुजाता या दोन मुली असा परिवार आहे.
सदाशिव पाचपुते हे पदवीधर होते. घरची परिस्थिती हलाखीची होती. अशा स्थितीत १९७८ साली बबनराव पाचपुते प्रथमच पंचायत समिती सदस्य झाले. त्यानंतर १९८० साली बबनराव पाचपुते आमदार झाले. यामध्ये सदाशिव पाचपुते यांचे योगदान महत्त्वाचे होते. तेव्हापासून गेल्या नऊ विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बबनराव पाचपुते यांच्या प्रचार नियोजनासह इतर बाबींची जबाबादरी पडद्याआड राहून पार पाडली. त्यांच्या खांद्यावर साईकृपा डेअरी, साईकृपा साखर कारखान्याची जबाबदारी होती. भाऊ आमदार असल्याने घरात दुसरे पद नको, अशी त्यांची भूमिका असायची. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते जिल्हा लेबर सदस्य व जिल्हा परिषद सदस्य झाले. ते स्पष्टवक्ते व हजरजबाबी होते. कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळण्याची त्यांची ख्याती होती.
----
१९ सदाशिव पाचपुते