जिल्हा परिषदेतील लिफ्ट अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:26 IST2021-08-24T04:26:33+5:302021-08-24T04:26:33+5:30

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते, अर्थ व पशुसंवर्धन ...

Zilla Parishad lift finally started | जिल्हा परिषदेतील लिफ्ट अखेर सुरू

जिल्हा परिषदेतील लिफ्ट अखेर सुरू

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, कार्यकारी अभियंता रवींद्र परदेशी, चौधरी आदी उपस्थित होते. गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेतील दोन्ही लिफ्ट नादुरुस्त झाल्याने बंद होत्या. पुढे कोरोनाच्या स्थितीमुळे शासनाकडून दुरुस्तीसाठी निधी मिळत नव्हता. दरम्यान, फेब्रुवारी २०२१ मध्ये शासनाने यासाठी निधी मंजूर करून दोन्ही नवीन लिफ्टसाठी परवानगी दिली. दोन्ही लिफ्टसाठी ४६ लाखांची तरतूद करण्यात आली होती. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या लिफ्टचे काम सुरू होते. अखेर सोमवारी ही लिफ्ट सर्वांसाठी खुली झाली.

---------

फोटो -२३झेडपी लिफ्ट

गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या जिल्हा परिषदेतील दोन्ही लिफ्ट अखेर सुरू झाल्या असून, सोमवारी पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या हस्ते लिफ्टचे उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Zilla Parishad lift finally started