शहरं
Join us  
Trending Stories
1
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
2
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
3
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
4
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
6
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
7
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
8
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
9
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
10
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
11
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
12
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
13
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
14
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
15
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
16
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
17
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
18
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या टॉप ५ महिला क्रिकेटपटू!
19
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
20
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

जिल्हा परिषदेत सडतेय लाखो रुपयांचे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:13 IST

जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करुन विकत घेतलेले मौल्यवान साहित्य जिल्हा परिषदेच्या जुन्या सभागृहात अक्षरश: सडत पडले आहे़.

साहेबराव नरसाळे । अहमदनगर : जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करुन विकत घेतलेले मौल्यवान साहित्य जिल्हा परिषदेच्या जुन्या सभागृहात अक्षरश: सडत पडले आहे़. मात्र, या साहित्याचा लिलाव करण्याची किंवा कर्मचारी विकत घेण्यास तयार असतानाही ते त्यांना न देता ते सडवण्याची भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने घेतल्याचे दिसत आहे़.जिल्हा परिषदेचा कारभार जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत २००७ साली स्थलांतरित झाला़. त्यावेळी जिल्हा परिषदेने जुन्या इमारतीतील कोणतेही साहित्य नव्या इमारतीत आणले नाही़. जुने सर्व साहित्य जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील अण्णासाहेब शिंदे सभागृहात व बांधकाम विभाग (दक्षिण), आरोग्य व पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आले़. या साहित्याचा लिलाव करण्याची मागणी वारंवार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली़. तसेच हे साहित्य बाहेर विकायचे नसल्यास कर्मचा-यांनीही ते विकत घेण्याची तयारी दर्शविली होती़. हे साहित्य सागवानी व दर्जेदार असल्यामुळे ते चांगली किंमत देऊन जिल्हा परिषदेचे कर्मचारीच विकत घेण्यास तयार होते़. याबाबत कर्मचा-यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन दिल्याचेही सांगण्यात येते़. मात्र, जिल्हा परिषदेने याबाबत काहीच निर्णय न घेता गेल्या १२ वर्षांपासून हे साहित्य तेथेच सडत ठेवण्याची भूमिका घेतली़. जुनी इमारत मोडकळीस आली असून, पावसाळ्यात ही इमारत गळत आहे़. त्यामुळे तेथील बरेचसे साहित्य कुजले असल्याचे सांगण्यात येते़. या जुन्या साहित्यामध्ये लोखंडी तिजो-या, लोखंडी कपाटे,  सागवानी टेबल, सागवानी खर्च्या, सागवानी कपाटे असे त्यावेळी घेतलेल्या दर्जेदार साहित्याचा समावेश आहे़. या साहित्याचा लिलाव करुन जिल्हा परिषदेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळालेही असते़. परंतु जिल्हा परिषदेने ज्याप्रमाणे अनेक ठिकाणी असणा-या जागांच्या हक्काच्या मिळकतीवर पाणी सोडले, त्याचप्रमाणे हे जुने साहित्य विकून अगदी सहज मिळणा-या उत्पन्नावरही पाणी सोडल्याचे दिसत आहे़.उदासीनतेमुळे लाखाचे बारा हजारलोखंडी तिजोºया, लोखंडी कपाटे, सागवानी टेबल, सागवानी खुर्च्या, सागवानी कपाटे असे साहित्य गेल्या १२ वर्षांपासून तसेच पडून आहे़. यातील अनेक साहित्य कुजले आहे़. त्यामुळे आता हे साहित्य टाकूनच द्यावे लागणार आहे़. जे साहित्य विक्रीयोग्य असेल त्यालाही कवडीमोल किमतीत विकावे लागणार आहे़. त्यामुळे जिल्हा परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान अधिका-यांच्या उदासीन वृत्तीमुळे झाले असून, याबाबत कर्मचा-यांमध्येही नाराजी असल्याचे दिसून येत आहे़.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद