कानोशी रस्त्यावर गावठी कट्ट्यासह युवक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:24 IST2021-02-09T04:24:11+5:302021-02-09T04:24:11+5:30

शेवगाव : तालुक्यातील कोनोशी ते नांदूर रस्त्यावर गावठी कट्टा घेऊन बसलेल्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासोबत एक अल्पवयीन ...

Youths arrested along with village gang on Kanoshi Road | कानोशी रस्त्यावर गावठी कट्ट्यासह युवक ताब्यात

कानोशी रस्त्यावर गावठी कट्ट्यासह युवक ताब्यात

शेवगाव : तालुक्यातील कोनोशी ते नांदूर रस्त्यावर गावठी कट्टा घेऊन बसलेल्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगाही पोलिसांनी ताब्यात घेतला.

अटक करण्यात आलेल्या युवकाचे बाबासाहेब दादाबा बटुळे (वय २७, रा. भाराजवाडी, ता. पाथर्डी) असे नाव आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना खबऱ्यामार्फत एक इसम कोनोशी ते नांदूर रस्त्यावरील खंडोबा मंदिराच्या शेजारील लिंबाच्या झाडाखाली गावठी कट्टा घेऊन बसल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान बडदे, पोलीस कर्मचारी राजू ढाकणे, दिलीप राठोड, भानाजी काळोखे, गणगे आदी पथकाने घटनास्थळी जाऊन आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्याजवळ एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस मिळून आले. बटुळेच्या विरोधात पोलीस कर्मचारी भानाजी काळोखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला.

Web Title: Youths arrested along with village gang on Kanoshi Road