तरुणांचे सामूहिक मुंडन
By Admin | Updated: March 9, 2016 23:58 IST2016-03-09T23:47:41+5:302016-03-09T23:58:16+5:30
अहमदनगर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त संभाजी भिडे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिव प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण राज्यात अभिवादन करण्यात आले.

तरुणांचे सामूहिक मुंडन
अहमदनगर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त संभाजी भिडे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिव प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण राज्यात अभिवादन करण्यात आले. शिव प्रतिष्ठानच्या नगर शाखेच्यावतीने बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर युवकांनी सामूहिक मुंडन करत संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली.
प्रतिष्ठानच्यावतीने धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान मास (महिना) सूतक पाळण्यात येणार आहे. महिनाभर प्रतिष्ठानचे सर्व साधक उपवास करून मिष्ठान्न, चहा, व्यसन, मनोरंजात्मक कार्यक्रम, तसेच पायात पादत्राणे घालणे आदी गोष्टी वर्ज्य करणार आहेत.
संपूर्ण महिना शोक व दु:खाचा महिना पाळण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. सामूहिक मुंडन उपक्रमात संदीप खामकर, राम नळकांडे, वृषभ गादिया, दातीर वस्ताद, देविदास मुदगूल, अभिजित भोसले, अंकुश माउली आदी सहभागी झाले. ७ एप्रिलला मूकयात्रा काढण्यात येणार आहे. युवकांनी यात सहभागी होवून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन खामकर यांनी केले आहे.
(प्रतिनिधी)