शिर्डीजवळ तरुणाची निघृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 20:06 IST2017-08-23T20:05:29+5:302017-08-23T20:06:53+5:30

शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निघोज शिवारातील एका पाण्याच्या चारीत २५ वर्षीय तरूणाचा मृतदेह बुधवारी आढळला. त्याच्या मृतदेहावर शस्त्राने वार केल्याच्या खुणा दिसत असल्याने त्याची निघृण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मयत तरूण हा टाकळी फाटा (कोपरगाव )येथील आहे. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

The youth was murdered near Shirdi | शिर्डीजवळ तरुणाची निघृण हत्या

शिर्डीजवळ तरुणाची निघृण हत्या

ठळक मुद्दे तीन जण पोलिसांच्या ताब्यातपाण्याच्या चारीत सापडला मृतदेह
र्डी : शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निघोज शिवारातील एका पाण्याच्या चारीत २५ वर्षीय तरूणाचा मृतदेह बुधवारी आढळला. त्याच्या मृतदेहावर शस्त्राने वार केल्याच्या खुणा दिसत असल्याने त्याची निघृण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मयत तरूण हा टाकळी फाटा (कोपरगाव )येथील आहे. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.मयत तरुणाचे नाव नानासाहेब लोणारी आहे. त्याची २२ व २३ आॅगष्टच्या दरम्यान निघोज परिसरातील रूई रस्त्यावर तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर,मानेवर, पोटावर व हातावर वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका पाण्याच्या चारीत टाकून देण्यात आला होता. या घटनेची माहिती निघोज येथील पोलीस पाटलाकडून बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना कळताच ते पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृत तरूणाची ओळख पटल्यानंतर तातडीने मयताच्या नातेवाईकांना बोलविण्यात आले. या तरूणाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासाची चक्रे तातडीने फिरवून या घटनेतील संशयित तीन तरूणाना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे निघोज परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: The youth was murdered near Shirdi