नोकरीसाठी तरुणांच्या रांगा

By Admin | Updated: May 26, 2014 00:26 IST2014-05-26T00:17:56+5:302014-05-26T00:26:54+5:30

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यातील सुशिक्षित बेराजगार तरुण- तरुणांनी युवक महोत्सवात आयोजित नोकरी मेळाव्यात अक्षरश: रांगा लावल्या़

Youth Ranks for Jobs | नोकरीसाठी तरुणांच्या रांगा

नोकरीसाठी तरुणांच्या रांगा

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यातील सुशिक्षित बेराजगार तरुण- तरुणांनी युवक महोत्सवात आयोजित नोकरी मेळाव्यात अक्षरश: रांगा लावल्या़ नोकरीसाठी तरुणांची सुरू असलेली धडपड यानिमित्ताने समोर आली असून, शिका व कमवा चा नवा मार्ग गवसल्याचे सामाधान तरुणांच्या चेहर्‍यावर दिसत होते़ त्याचवेळी नोकरी मिळाली नाही तर चालेल पण अनुभव तर आला, अशा भावनाही काहींनी यावेळी व्यक्त केल्या़ जयहिंद युवा मंच व एनएसयुआयच्या वतीने आयोजित युवक महोत्सवात रविवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ नोकरीसाठी तरुणांनी सकाळपासूनच प्रवेशव्दारावर एकच गर्दी केली होती़ दहावी, बारावी आणि विविध शाखेत पदवी घेतलेल्यांचीही संख्या मोठी होती़ आवश्यक कागदपत्रे घेऊन तरुण दाखल झाले़ परंतु गर्दी मोठी होती़ त्यामुळे प्रवेशव्दारावरच अर्ज भरून घेण्यात आले़ अर्ज सादर करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ रांगेत उभे राहून तरुणांनी मुलाखतीसाठी अर्ज दाखल केले़ प्रवेशव्दारावरच पात्रता तपासून आत प्रवेश देण्यात आला़ शिक्षण आणि नोकरी एकाच वेळी करता येते, ते माहित नव्हते़ इथे आल्यानंतर दोन्ही एकाच वेळी करणे शक्य असल्याची नवी माहिती मिळाली असल्याचे मुलखातीसाठी आलेल्या एकाने सांगितले़ मेळाव्या निमित्ताने नोकरीची निवड करण्याची संधी तरुणांना मिळाली़ एका कंपनीने नाकारले म्हणून काय झाले़ दुसर्‍या कंपनीकडे मुलाखत देऊ, असे म्हणून तरुणांनी जवळपास सर्वच कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे विचारपूस केली़ कंपन्यांना मार्केटिंगसाठी मुलांची आवश्यकता असते आणि युवकांना नोकरी, त्यामुळे नोकरी देणार्‍या कंपन्या आणि नोकरी हवी असणार्‍यांची गर्दी येथे पाहायला मिळाली़ त्यात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करणार्‍यांना तर नोकरीची कमी नसते़ परंतु कला शाखेत पदवी संपादन करणार्‍यांना मात्र सुरुवातीला ट्रेनी म्हणून काम करावे लागेल़ काम आवडल्यास पुढे कायम करू अन्यथा नाही असे सांगण्यात येत होते़ कंपनीचे हे आव्हान अनेकांनी पेलले आणि कामावर हजर होण्याची तयारी दर्शविली़ सकाळपासून सायंकाळपर्यंत तरुणांची गर्दी कायम होती़ नोकरी मिळाल्याचे समाधान अनेकांनी व्यक्त केले़ (प्रतिनिधी)आज तंत्रज्ञानात मोठा बदल होत आहे़ आयटी कंपन्या उभ्या राहत आहेत़ त्यामुळे टेक्निकल स्टाफची गरज आहे़पारंपरिक शिक्षण घेणार्‍या तरुणांना या क्षेत्रात संधी नाही़ त्यांना घेतले तरी त्यांना प्रशिक्षण द्यावे लागते़ त्यात ते किती अवगत करतात़त्यावर बरेच काही अवलंबून असते़ त्यामुळे आता तरुणांनी अभियांत्रिकी शिक्षण घेणे गरजेचे झाले आहे़आयटी क्षेत्रात मोठ्या रोजगाराच्या संधी असून, पगारही चांगला मिळतो़ त्यामुळे तंत्र शिक्षण ही आजच्या काळाजी गरज आहे,असे येथील कंपनीच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले़सेल्समन, एच़ आऱ, सुपरव्हायझर, हेल्पर, आयटीआय, मार्केटिंग, आॅफीशियल युवकांना ज्या क्षेत्रात आवड आहे़ त्या क्षेत्रातच त्यांनी शिक्षण घेतले पाहिजे़ परंतु त्याबरोबरच जगात काय सुरू आहेक़शाला महत्व आहे, हे ओळखून शिक्षण घ्यावे,जेणे करून नोकरीसाठी त्यांना फिरावे लागणार नाही़ -प्रभू किट्टीमनी, कंपनी प्रतिनिधी इथे आल्यानंतर विविध प्रकारची माहिती मिळाली़ खेड्यात अशी कोणती माहिती मिळत नाही़ त्यामुळे असा मेळावा असला की त्याला भेट देण्याची आवड आहे़ नोकरी करण्याची इच्छा आहे़ परंतु नोकरी मिळत नाही़ इथे नोकरी मिळेल, अशी अपेक्षा आहे़ -बाबासाहेब सावंत, एफ ़ वायबी़ए़,श्रीरामपूर पदवीच्या दुसर्‍या वर्षाला आहे़ परंतु नोकरी करावी, असे वाटते म्हणून इथे आलो. याठिकाणी चांगली माहिती मिळाली़ पुण्यात शिकवा व कमवा, अशी योजना कंपनीत असेल, याची माहिती नव्हती़ ही माहिती इथे आल्यानंतर मिळाली़ हा मेळावा उत्तम असून,जी माहिती नव्हती़ ती मिळाली असून, नोकरी मिळो अथवा न मिळो पण अनुभव आला़ -अण्णा डुकरे, एफ ़ वाय़ बीएस्सी, टाकळीभान. कंपन्यांना कामगारांची गरज आहे़ तर युवकांना नोकर्‍या मिळत नाहीत़ दोघांना मेळ घालण्यासाठी अनेक दिवसांपासून कंपनी काम करत आहे़याठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला असून,पाच हजार मुलांनी मुलाखती दिल्या असून,एक मिडियेटर म्हणून काम पाहत आहे़ -श्रीराम सातपुते, पुणे आज टेक्निकल स्टाफची सर्वाधिक गरज आहे़ अभियांत्रिकी शिक्षण घेणार्‍या मुलांना कंपनीत प्राधान्य असून, मुलांनी आता हे शिक्षण घेणे गरजेचे झाले असून,या क्षेत्रात पगारही चांगला मिळतो़ -अजय कुमार, कंपनी प्रतिनिधी

Web Title: Youth Ranks for Jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.