हुल्लडबाजीतून तरूण बचावला
By Admin | Updated: July 13, 2016 00:30 IST2016-07-12T23:59:48+5:302016-07-13T00:30:27+5:30
निघोज : येडगाव धरणातून पाणी सुटल्याने कुकडी नदीला रविवारी सायंकाळी पूर आला. त्यामुळे निघोजमधील जगप्रसिद्ध कुंडही पाण्याखाली गेले.

हुल्लडबाजीतून तरूण बचावला
निघोज : येडगाव धरणातून पाणी सुटल्याने कुकडी नदीला रविवारी सायंकाळी पूर आला. त्यामुळे निघोजमधील जगप्रसिद्ध कुंडही पाण्याखाली गेले. मात्र पुरात हुल्लडबाजी करण्याचा जीवघेणा प्रयत्न काही पर्यटकांनी केला, परंतु निघोजमधील सतर्क तरुणांनी त्याला वाचविले. त्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर फिरवल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय होता.
येडगाव धरण क्षेत्रात जोदार पाऊस झाल्याने तेथून कुकडी नदीत रविवारी दुपारी पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान निघोजनजीक पोहोचल्यावर जगप्रसिध्द कुंड पर्यटन क्षेत्रात पूर आला होता. कुंड तर पाण्याखाली गेलेच शिवाय तेथील मळगंगा मंदिराचा परिसर जलमय झाला होता. पूर पाहण्यासाठी निघोजसह परिसरातील गावांमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, पूर परिस्थितीवर तहसीलदार भारती सागरे, मंडलाधिकारी तात्या कुलट, चंद्रकांत लामखडे, कुकडीचे उपअभियंता एस. व्ही. साळवे, सरपंच ठकाराम लंके, माजी सरपंच संदीप वराळ, बबन कवाद यांच्यासह शिवबा प्रतिष्ठान व शिवनेरी प्रतिष्ष्ठानचे युवक व ग्रामस्थ लक्ष ठेवून होते.
(वार्ताहर)