गळफास घेऊन तरुणानं संपवला जीवन प्रवास, उक्कलाव येथील घटना
By शिवाजी पवार | Updated: April 9, 2023 17:38 IST2023-04-09T17:38:14+5:302023-04-09T17:38:39+5:30
मृत्यूचं कारण स्पष्ट नाही.

गळफास घेऊन तरुणानं संपवला जीवन प्रवास, उक्कलाव येथील घटना
श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : तालुक्यातील उक्कलगाव येथील एका २३ वर्षीय अविवाहित युवकाने राहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना घडली.
मयत तरुणाचे नाव आकाश काटे असे आहे. पटेलवाडी परिसरात त्याचे घर होते. काही दिवसांपूर्वी त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात त्याला त्यावेळी भरती करण्यात आले होते.
या घटनेतून बचावल्यानंतर आकाश याने हे कृत्य केले. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. मोलमजूरी करून आकाश उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. उक्कलगाव येथील स्मशानभूमित शोकाकूळ वातावरणात आकाशवर अत्यसंस्कार करण्यात आले.