हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:17+5:302021-08-13T04:25:17+5:30
या घटनेनंतर पीडित तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा अमित प्रकाश चांदणे (रा. जयभवानी चौक, वडगाव गुप्ता, ...

हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार
या घटनेनंतर पीडित तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा अमित प्रकाश चांदणे (रा. जयभवानी चौक, वडगाव गुप्ता, ता. नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक केली. गुरुवारी आरोपीला न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यातील पीडित तरुणी ही नगर शहरात राहणारी आहे. आरोपी चांदणे आणि तिचा परिचय होता. गुरुवारी सायंकाळी फ्लॅट दाखविणे व वकील भेटण्यासाठी येणार आहेत, असा बहाण करून आरोपी तरुणीस त्याच्या मोटारसायकलवरून हॉटेलमध्ये घेऊन आला. तरुणीस रूममध्ये नेल्यानंतर तिला काेल्ड्रिंक्स पिण्यास दिले. त्यानंतर आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्यास विरोध केला तेव्हा त्याने तिचे अश्लील फोटो काढून इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडितेने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डी. एस. मुंडे पुढील तपास करत आहेत.