मध्य प्रदेशातील युवतीच्या गर्भाशयाची दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:36+5:302021-02-05T06:40:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : मध्य प्रदेश राज्यातील सतना येथील २२ वर्षीय युवतीच्या गर्भाशयामध्ये ३ किलो वजनाचे दोन फायब्रॉईड(गाठी) ...

मध्य प्रदेशातील युवतीच्या गर्भाशयाची दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : मध्य प्रदेश राज्यातील सतना येथील २२ वर्षीय युवतीच्या गर्भाशयामध्ये ३ किलो वजनाचे दोन फायब्रॉईड(गाठी) होत्या. अल्पवयामध्ये अशा गाठी होणे हा एक दुर्मिळ आजार आहे. रुग्णाच्या भावी आयुष्याचा विचार करता, गर्भाशयाचे नुकसान न करता या गाठी काढणे एक जटिल व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. मात्र, राहाता येथील डॉ. नितीन घोरपडे यांनी आपल्या इन्सपिरीया लेप्रोस्कोपी व आयव्हीएफ रिसर्च सेंटरमध्ये लेप्रोस्कोपी ( दुर्बीणीद्वारे ) शस्त्रक्रिया करून सुमारे ३ किलो वजनाचे दोन गोळे काढले आहेत.
शक्यतो अशा प्रकारचे ऑपेरेशन ओपन सर्जरीद्वारे केले जाते. ज्यामध्ये रुग्णाच्या पोटावर मोठे व्रण पडतात. रुग्ण बरा व्हायला बराच कालावधी जातो आणि रुग्णाचे भावी आयुष्य सामान्य जाईल की नाही याची खात्री देता येत नाही. परंतु, राहाता येथील डॉ. घोरपडे यांच्या शस्त्रक्रिया कौशल्यामुळे व येथे उपलब्ध असलेल्या ३ डी कॅमेऱ्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया कमीत कमी छेद घेऊन दुर्बीणीद्वारे यशस्वीरीत्या पार पडली. यामुळे रुग्णाच्या शरीरावर कमीत कमी व्रण राहतात. एक ते दोन दिवसांत रुग्ण घरी जाऊ शकतो आणि रुग्णाचे भावी आयुष्य सामान्यपणे जाऊ शकते.
अतिशय जटिल व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया दुर्बीणीद्वारे यशस्वी केल्याबद्दल डॉ.नितीन घोरपडे यांचे मेडिकल क्षेत्रातील तज्ज्ञांनी कौतुक केले. संपूर्ण भारतातून व परदेशातून स्त्रीरोग संदर्भातील सर्व जटिल व गंभीर शस्त्रक्रियांसाठी रुग्ण राहाता परिसरातील डॉ. घोरपडे यांच्या इन्सपिरीया लेप्रोस्कोपी व आयव्हीएफ रिसर्च सेंटरमध्ये येत असतात ही एक कौतुकाची बाब आहे. ( वा.प्र. )
..............
फोटो२७ - डॉ. नितीन घोरपडे - कोपरगाव