राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शीतल देठे या तरुणीला विवाहासाठी गणेगाव येथील सुयोग कोबरणे या तरुणाचे स्थळ आले होते. काही दिवसांपूर्वी नातेवाइकांच्या मध्यस्थीने एकमेकांची पसंती झाली. १५ जुलै २०२१ रोजी साखरपुडा करण्याचे ठरले होते. दरम्यान, दोघांचे व्हाॅट्सॲपवर बोलणे सुरू झाले. १२ जुलैला सायंकाळी चार ते सहा वाजेदरम्यान मोबाइलवर संभाषण झाले होते. त्यानंतर शीतल नाराज झाली होती. आईवडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारले, `सुभाष कोबरणे याने लग्न करण्यास नकार दिला आहे. लग्नानंतर आपण खूश राहू शकत नाही. तू दुसरा मुलगा पाहा` असे फोनवरून सांगितल्याचे शीतलने सांगितले. त्याच दिवशी रात्री दहा वाजेदरम्यान शीतल हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ हे करीत आहेत.
लग्नाला नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST