रक्तदानासाठी तरुणांनी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:19 IST2021-04-14T04:19:31+5:302021-04-14T04:19:31+5:30
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त मंगळवारी दरेवाडी (ता. नगर) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वामी विवेकानंद वाचनालय आणि जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने ...

रक्तदानासाठी तरुणांनी पुढे यावे
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त मंगळवारी दरेवाडी (ता. नगर) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वामी विवेकानंद वाचनालय आणि जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
बेरड म्हणाले की, इतर वेळी राजकीय कार्यक्रम किंवा ग्रामीण भागात यात्रा, जत्रेच्या वेळी रक्तदान शिबिरातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन होत असते, मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व कार्यक्रम बंद असल्याने रक्तसंकलन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. परंतु गावागावातून तरुणांनी रक्तदानासाठी पुढे आले तर काही प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळेल.
उपसरपंच अनिल करांडे म्हणाले, दरेवाडी ग्रामस्थ विधायक कामासाठी नेहमीच पुढे असतात. या रक्तदान शिबिरात तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात शासकीय नियमांचे पालन करून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन बेरड, संदीप आसाराम बेरड, श्रीकांत नवनाथ कराळे, अक्षय दत्तू चव्हाण, प्रशांत अविनाश बेरड, किरण अंबादास बेरड, प्रशांत भीमराज बेरड, मार्गदर्शक सुभाष नाना बेरड आदी उपस्थित होते.
---------
फोटो मेलवर
१३दरेवाडी रक्तदान शिबिर
गुढीपाडव्यानिमित्त दरेवाडी येथे झालेल्या रक्तदान शिबिरात तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.