चाकूच्या धाकाने तरुणाचे पैसे लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:50 IST2021-01-13T04:50:35+5:302021-01-13T04:50:35+5:30

घरफोडी करून पैसे, दागिने चोरले अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने ...

The young man's money was taken away with a knife | चाकूच्या धाकाने तरुणाचे पैसे लांबविले

चाकूच्या धाकाने तरुणाचे पैसे लांबविले

घरफोडी करून पैसे, दागिने चोरले

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ८ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये कारभारी जयराम बागूल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार गवळी पुढील तपास करत आहेत.

घरातून टीव्हीचा स्पीकर चोरला

अहमदनगर : शहरातील विराज कॉलनी येथे चोरट्यांनी घरफोडी करून २१ हजार रुपये किमतीचा टीव्हीचा स्पीकर चोरून नेला. ६ ते ७ जानेवारीदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अभिजत अशोक काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल खंडागळे पुढील तपास करत आहेत.

२५ क्विंटल कांदा चोरला

अहमदनगर : शेतकऱ्याने शेतात ताडपत्रीखाली झाकून ठेवलेला २५ क्विंटल कांदा चोरट्यांनी ताडपत्रीसह चोरून नेला. ८ ते ९ जानेवारीदरम्यान पारनेर तालुक्यातील गारखिंडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये संतोश रावजी झिंजाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल उजगरे पुढील तपास करत आहेत.

Web Title: The young man's money was taken away with a knife