गावठी कट्ट्यासह तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 23:12 IST2016-06-19T23:07:10+5:302016-06-19T23:12:36+5:30
नेवासा : गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे घेऊन विक्रीसाठी निघालेल्या तरुणास सापळा रचून नेवासा पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

गावठी कट्ट्यासह तरुणास अटक
नेवासा : गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे घेऊन विक्रीसाठी निघालेल्या तरुणास सापळा रचून नेवासा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. शनिवारी सायंकाळी ७-३० वाजता नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा जवळील वनीकरण कार्यालयानजीक ही घटना घडली. विशाल ऊर्फ पप्पू राजेंद्र इंगळे हे अटक केलेल्याचे नाव आहे.
नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक जांभळे, पो.हे.कॉ. ंिशंदे, सुनील शिरसाठ, बाबा लबडे, योगेश भिंगारदिवे, नागरगोजे, बैरागी यांचे पथक नेऊन सापळा रचून त्यास अटक केली. मुकिंदपूर झोपडपट्टीकडून येत असलेला इंगळे मोटारसायकलवरून आलेल्या तरुणाशी चर्चा करीत असताना त्यांना पोलिसांनी गराडा घातला व त्यास पकडण्याचे तयारीत असताना मोटारसायकलस्वार पळून गेला. रस्त्यावर उभा असलेला विशाल पप्पू राजेंद्र इंगळे यास पकडण्यात यश मिळाले. त्याची झडती घेतली असता त्याचे कंबरेला असलेला गावठी कट्टा व दोन
काडतुसे ताब्यात घेऊन त्यास अटक केली. (तालुका प्रतिनिधी)