कोपरगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:14 IST2021-07-03T04:14:21+5:302021-07-03T04:14:21+5:30
कोपरगाव : राहत्या घरातील सिलिंग फॅनला केबल बांधून गळफास घेऊन एका चोवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( ...

कोपरगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
कोपरगाव : राहत्या घरातील सिलिंग फॅनला केबल बांधून गळफास घेऊन एका चोवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि .२) सकाळी ११ वाजेपूर्वी कोपरगाव शहरातील समतानगर भागात घडली आहे. सुशील विलास कुसाळकर असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.
मयत सुशील आई-वडिलांसमवेत समतानगर परिसरात राहत होता. गुरुवारी रात्री तो राहत्या घरी त्याच्या रूममध्ये जाऊन झोपला. मात्र, सकाळी त्याच्या वडिलांनी आवाज दिले असता त्याने प्रतिसाद दिला नाही, त्याच्या वडिलांनी मागील बाजूस असलेले दार उघडून पाहिले तर सुशीलने पंख्याला केबल बांधून आत्महत्या केल्याचे त्यांचे निदर्शनास आले. सुशीलचे वडील कपड्याचे व्यावसायिक आहेत. दरम्यान शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.