तरुणास बाटलीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:20 IST2021-02-13T04:20:59+5:302021-02-13T04:20:59+5:30

निलेश बाळासाहेब शेजवळ हे ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे उभे होते. ...

Young man beaten with a bottle | तरुणास बाटलीने मारहाण

तरुणास बाटलीने मारहाण

निलेश बाळासाहेब शेजवळ हे ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे उभे होते. दत्तात्रय माळवदे व गोट्या माळवदे हे दोघे दारू पिऊन आले. तू येथे उभा का राहिलास असे म्हणत दत्तात्रय माळवदे याने निलेशला डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केले. तसेच गोट्या माळवदे याने शिवीगाळ करून लाथा- बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

निलेश बाळासाहेब शेजवळ यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय माळवदे व गोट्या माळवदे या दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वैभव साळवे हे करीत आहेत. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Young man beaten with a bottle