दारू पाजण्यास नकार दिल्याने तरुणावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:39+5:302021-07-23T04:14:39+5:30

जखमीचे नाव रमजान चिराउद्दीन सय्यद (वय २९, शिरसगाव) असे आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक एकमधील लबडे पेट्रोल पंपाच्या परिसरात बुधवारी ...

Young man attacked for refusing to drink alcohol | दारू पाजण्यास नकार दिल्याने तरुणावर हल्ला

दारू पाजण्यास नकार दिल्याने तरुणावर हल्ला

जखमीचे नाव रमजान चिराउद्दीन सय्यद (वय २९, शिरसगाव) असे आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक एकमधील लबडे पेट्रोल पंपाच्या परिसरात बुधवारी रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली.

शेतकरी तरुण असलेला सय्यद हा घरी जात असताना आरोपी नदीम पिंजारी व राजू जाधव (दोघेही रा. श्रीरामपूर) यांनी त्याला अडविले. दारू पाजण्याचा आग्रह धरला. मात्र आपल्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे तुमची मागणी पूर्ण करू शकत नाही, असे सय्यद याने दोघांना सांगितले. सय्यद याच्याकडून नकार मिळताच आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. धारदार चॉपरने पाठीवर वार केले. हल्ल्यात सय्यद हा गंभीर जखमी झाला. पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी सय्यद याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

-------

Web Title: Young man attacked for refusing to drink alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.