योगामुळे आनंदाचा प्रत्यय येतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:57+5:302021-06-22T04:14:57+5:30
चैतन्य बहुउद्देशीय प्रतिष्ठाण व मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. कुमार ...

योगामुळे आनंदाचा प्रत्यय येतो
चैतन्य बहुउद्देशीय प्रतिष्ठाण व मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. कुमार चोथाणी हे यावेळी उपस्थित होते. प्रारंभी योगगुरू अनिल कुलकर्णी यांनी योगदिनाचे महत्त्व सांगितले. कोरोना संकटात रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. त्यामुळे योगासन व प्राणायाम केल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होतो, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
डॉ. कुमार चोथाणी म्हणाले, प्राणायाम व योगा जीवनाचा अविभाज्य भाग बनावा यासाठी सातत्य ठेवा. गेल्या ३० वर्षांपासून शहरात योगगुरू अनिल कुलकर्णी योगाच्या माध्यमातून जी सेवा करीत आहेत ती स्तुत्य आहे. लोकांनी याचा लाभ घेऊन आपले आरोग्य चांगले ठेवावे. यात प्रत्येकाचा स्वार्थ आहे. नियमित योगा हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
प्रास्ताविक मेडिकल असोसिएशन अध्यक्ष भूषण देव यांनी केले. डॉ. मोनिका संचेती, सविता बढे, धनंजय बधे, डॉ. मनोज संचेती, अशोक थोरे यांनी प्रात्यक्षिके सादर केली. डॉ. सतीश कोठारी, आबा बिरारी, मनसुख चोरडिया, रतन सेठी,चंदू नायर, विशाल बधे, डॉ. संजय शेळके, बागवान उपस्थित होते. भागवत लासुरे यांनी आभार मानले.
--------