हळदी कुंकू, तिळगूळाने भरला निवडणुकीत रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:52 IST2021-01-13T04:52:56+5:302021-01-13T04:52:56+5:30

विसापूर परिसरातील पिंपळगाव पिसा, विसापूर व घुटेवाडी या ग्रामपंचायती वगळता सर्व गावांत निवडणुकीचा संग्राम चालू आहे. परिसरातील मुंगूसगाव, सुरेगाव, ...

Yellow kumkum, sesame filled with election color | हळदी कुंकू, तिळगूळाने भरला निवडणुकीत रंग

हळदी कुंकू, तिळगूळाने भरला निवडणुकीत रंग

विसापूर परिसरातील पिंपळगाव पिसा, विसापूर व घुटेवाडी या ग्रामपंचायती वगळता सर्व गावांत निवडणुकीचा संग्राम चालू आहे. परिसरातील मुंगूसगाव, सुरेगाव, उख्खलगाव, चांभूर्डी, सारोळा सोमवंशी, कोरेगव्हाण, निंबवी, कोंडेगव्हाण व एरंडोली या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या बहुतांश गावात दुरंंगी लढती होत असल्याने अटीतटीच्या लढती पहायला मिळत आहेत. त्यात या काळात मकर संक्रांत असल्याने महिला उमेदवार व पुरुष उमेदवारांच्या सौभाग्यवती गावांमध्ये हळदी कुंकवाच्यानिमित्ताने घरोघरी महिला मतदारांना आकृष्ट करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. घरोघरी जाऊन तिळगुूळ वाटपाचा कार्यक्रम सर्वच उमेदवारांनी सुरू केले आहेत. १४ जानेवारीला मकरसंक्रांत व दुसऱ्याच दिवशी १५ ला मतदान असल्याने सुवासिनींना आकृष्ट करण्यासाठी हळदी कुंकवाच्याबरोबर आणखी काही वाण म्हणून भेट देता येईल का? याही प्रयत्नात काही उमेदवार असणार आहेेत. मकर संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी मतदान असल्याने संक्रांत कोणाला पावणार याचा घोर सर्वच उमेदवारांना लागला आहे.

Web Title: Yellow kumkum, sesame filled with election color