येळकोट येळकोट जय मल्हार....कोरोना होऊ दे हद्दपार, राहुरीच्या खंडोबा यात्रेची दोनशे वर्षांची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:32 IST2020-04-12T13:32:09+5:302020-04-12T13:32:47+5:30
राहुरी : राहुरीचे ग्रामदैवत खंडोबा महाराज यांची यात्रा उत्सव परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे. कोरानाचे सावट असल्यामुळे खंडोबा मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिराला कुलूप लावून बंद करण्यात आले. इतिहासात प्रथमच दोनशे वर्षांची यात्रेची परंपरा खंडित झाली. येळकोट येळकोट जय मल्हार, कोरोना होऊ दे हद्दपार, अशीच याचना ग्रामस्थांनी केली.

येळकोट येळकोट जय मल्हार....कोरोना होऊ दे हद्दपार, राहुरीच्या खंडोबा यात्रेची दोनशे वर्षांची परंपरा खंडित
राहुरी : राहुरीचे ग्रामदैवत खंडोबा महाराज यांची यात्रा उत्सव परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे. कोरानाचे सावट असल्यामुळे खंडोबा मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिराला कुलूप लावून बंद करण्यात आले. इतिहासात प्रथमच दोनशे वर्षांची यात्रेची परंपरा खंडित झाली. येळकोट येळकोट जय मल्हार, कोरोना होऊ दे हद्दपार, अशीच याचना ग्रामस्थांनी केली.
आज रविवारी राहुरीचे ग्रामदैवत खंडोबाची यात्रा म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र संचारबंदी असल्यामुळे भाविक मंदिराकडे फिरकले नाहीत. घरी बसून येळकोट जय मल्हार म्हणत भाविकांनी यंदा घरीच यात्रा साजरी केली. यात्रा उत्सवाच्या दोनशे वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच यात्रा खंडित झाल्याचे समोर आले आहे. राहुरीच्या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भाविक दरवर्षी हजेरी लावत असतात. माणसांनी भरलेल्या बारागाड्या ओढण्याची परंपरा जुन्या काळापासून चालत आली आहे. कुस्तीच्या हंगामाला ही पहिलवान हजेरी लावत असतात.
कोरोनाच्याच्या पार्श्वभूमीवर यंदा यात्रा उत्सव भरणार नसल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.त्यानुसार आज रविवारी यात्रा संपन्न झाली नाही. भाविकांनी घरी खंडोबाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. भाविकांनी घरी राहूनच खंडोबाचे दर्शन घ्यावे,असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद देत घरीच यात्रा साजरी केली. त्यामुळे अनेक पिढ्यांची यात्रा भरण्याची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाल्याचे भाविकांकडून सांगण्यात आले. राहुरी येथे जुने मंदिर होते. दांशुर अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर दहा वषार्पूर्वी मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धा करण्यात आला होता.
---
खंडोबा यात्रा कमिटीच्या वतीने बैठकीमध्ये यात्रा भरण्याचे नियोजन करण्यात आले होते मात्र कुणाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता सर्वांनी घरी बसूनच यात्रा उत्सव साजरा करावा असे आव्हान यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. यात्रा कमिटीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व भाविकांची मन:पूर्वक आभार. पोलिसांनी मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवला होता.