यंदाचा यात्रौत्सव होणार साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST2021-01-17T04:18:33+5:302021-01-17T04:18:33+5:30

शनिवारी सकाळी कोल्हार देवालय ट्रस्ट विश्वस्त मंडळ, यात्रौत्सव समिती आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामदैवत श्री भगवतीमाता मंदिरात यात्रौत्सव आयोजनाबाबत ...

This year's pilgrimage will be simple | यंदाचा यात्रौत्सव होणार साधेपणाने

यंदाचा यात्रौत्सव होणार साधेपणाने

शनिवारी सकाळी कोल्हार देवालय ट्रस्ट विश्वस्त मंडळ, यात्रौत्सव समिती आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामदैवत श्री भगवतीमाता मंदिरात यात्रौत्सव आयोजनाबाबत झालेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. ग्रामदैवत श्री भगवतीमातेचा यात्रौत्सव दरवर्षी पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा असा सुमारे महिनाभर मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि भाविकांची गर्दी टाळण्यासाठी खबरदारी म्हणून यंदाचा यात्रौत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. यात्रौत्सवानिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे. पौष पौर्णिमा (दि. २८) रोजी पहिल्या दिवशी सकाळी भगवती मातेस महाअभिषेक, सिंदूरलेपन, महाआरती आदी धार्मिक विधी होतील. सायंकाळी केवळ पारंपरिक सनई-चौघड्याच्या मंगलवाद्यांसह देवीची छबिना (पालखी) मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरवर्षी पालखी मिरवणूक रात्री मंदिर परिसरात आल्यानंतर होणारी शोभेच्या दारूची आतषबाजी यंदा होणार नाही. यात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या लोककलावंतांच्या हजेऱ्या आणि कुस्त्यांचा हंगामा आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यात्रौत्सवानिमित्त मंदिर प्रांगणात मेवा मिठाई, खाद्यपदार्थ, अलंकार, खेळणी आदी दुकाने लावण्यास मनाई राहील. कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भास्करराव खर्डे, कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, भगवतीपूरचे माजी सरपंच रावसाहेब खर्डे, उपसरपंच अशोकराव दातीर, विश्वस्त श्रीकांत खर्डे, राजेंद्र गाढे, बाबासाहेब दळे, प्रकाश खर्डे, भाऊसाहेब प्रभाकर खर्डे, प्रभाकर खर्डे, पांडुरंग देवकर, वसंत खर्डे, सुनील थेटे उपस्थित होते.

Web Title: This year's pilgrimage will be simple