यंदा बाप्पांचा मंडप दहा बाय दहामध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:28 IST2021-09-10T04:28:06+5:302021-09-10T04:28:06+5:30

अहमदनगर : कोरोनामुळे गणेश मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या आकारावरही यंदा मर्यादा आली आहे. महापालिकेने शहरातील गणेश मंडळांना १० बाय ...

This year, Bappa's mandap is only in ten by ten | यंदा बाप्पांचा मंडप दहा बाय दहामध्येच

यंदा बाप्पांचा मंडप दहा बाय दहामध्येच

अहमदनगर : कोरोनामुळे गणेश मंडळांकडून उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या आकारावरही यंदा मर्यादा आली आहे. महापालिकेने शहरातील गणेश मंडळांना १० बाय १० आकाराचे मंडप उभारण्यास परवानगी दिली असून, ६० टक्के रस्ता वाहतुकीसाठी मोकळा ठेवण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे.

महापालिकेने गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबविली होती. या योजनेंतर्गत अतिक्रमण विभागाने गुरुवारी दिवसभरात ८४ सार्वजनिक मंडळांना परवानगी दिली. गतवर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मंडळांना परवानगी दिली नव्हती. सन २०१९ मध्ये २७२ सार्वजनिक मंडळांनी परवानगी घेतली होती. यंदा सार्वजनिक गणेश मंडळे परवानगीसाठी आली नाहीत. शेवटच्या दिवशी मात्र परवानगी घेण्यासाठी पालिकेत गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. महापालिकेने अग्निशमन व नगररचना या दोन्ही विभागांची ना-हरकत घेऊन मंडळांना परवानगी दिली. यापूर्वी पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, धर्मादाय सहायक आयुक्तांचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतर परवानगी दिली जात होती. चालूवर्षी इतर विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र न घेता महापालिकेने परवानगी दिली असून, वाहतुकीसाठी रस्ता खुला ठेवून मंडप उभारण्यास परवानगी दिली आहे.

....

खड्डयांचे शुल्कही मंडळांना माफ

मंडप उभारण्यासाठी मंडळांकडून रस्त्यात खड्डे घेतले जातात. खड्डे खोदल्याच्या बदल्यात मंडळांना शुल्क भरावे लागत होते. यंदा महापालिकेनेही ही अटही रद्द केली असून, यामुळे गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: This year, Bappa's mandap is only in ten by ten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.