शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

प्रेमासाठी दीड वर्षात साडेचारशे अल्पवयीन ‘सैराट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 11:22 IST

‘प्रेमासाठी काय पण’ असे म्हणत गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील ४६४ अल्पवयीन मुले-मुली घरातून ‘सैराट’ (पळून गेले) झाले आहेत. यामध्ये ३६४ मुली तर १०० मुलांचा समावेश आहे.

ठळक मुद्देप्रियकरासाठी घरच्यांशी बंडखोरी

अरूण वाघमोडेअहमदनगर : ‘प्रेमासाठी काय पण’ असे म्हणत गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील ४६४ अल्पवयीन मुले-मुली घरातून ‘सैराट’ (पळून गेले) झाले आहेत. यामध्ये ३६४ मुली तर १०० मुलांचा समावेश आहे. शाळा-विद्यालयात नकळत झालेले प्रेम आणि लग्नाचे आमिष दाखवून मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे.मध्यंतरी लोकप्रिय ठरलेल्या सैराट चित्रपटातील नायक-नायिकेप्रमाणे अनेक प्रेमीयुगुलांनी भूमिका अदा करत घरातून परागंदा होणे पसंत केले आहे. सुखी संसाराचे स्वप्न पाहत प्रियकराचा हात धरून पळून गेलेल्या अनेक मुली पोलिसांना दयनीय अवस्थेत मिळून आल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून पळून नेलेल्या मुलींना वाम मार्गाला लावल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. टिव्ही, मोबाईल, बाईक, पॉकेट मनी अशी भौतिक सुविधेची सर्व साधने सहज उपलब्ध होत असल्याने कोवळ्या वयात प्रेमाचे आकर्षण वाटू लागते. आई-वडील, नातेवाईक यासह भविष्याचा कुठलाही विचार न करता चित्रपटातील आभासी दृश्यांसारखे मुले-मुली थेट घरातून पळून जातात. जवळचे पैसे संपल्यानंतर त्यांना वास्तवाचे भान होते.काही मुले-मुली परत घरी येतात तर काही जण नातेवाईकांच्या भीतीपोटी घरी न येता आहे त्या परिस्थितीत जीवन जगत राहतात. प्रेमप्रकरणातून पळून गेलेल्या मुला-मुलींचे बहुतांशी नातेवाईक समाजाच्या भीतीपोटी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करत नाहीत. घरातील मुले-मुली पळून गेल्याने दोन कुटुंब अथवा दोन समूहात वाद होण्याच्या जिल्ह्यात अनेक घटना समोर आल्या आहेत.शारीरिक आकर्षण़़ ...लग्नाचे आमिष

मुला-मुलींनी पौगंडाअवस्थेत पदार्पण केल्यानंतर एकमेकांबद्दल शारीरिक आकर्षण वाढून प्रेमप्रकरण सुरू होते. काही मुली या प्रेमातून सावरतात तर काही चित्रपटातील कथानकाप्रमाणे थेट घरच्यांशी बंडखोरी करून घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. अनेक सज्ञान तरूण अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे शोषण करतात तर कधी त्यांना पळवून नेतात. अशा अनेक घटना जिल्ह्यात समोर आल्या आहेत.मुलींना केले नातेवाईकांच्या स्वाधीनपळवून नेलेल्या मुला-मुलींबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो. तीन महिन्यात या गुन्ह्याचा तपास लागला नाही तर ही केस अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे येते. गेल्या सहा महिन्यात या कक्षाने पळून गेलेल्या व पळवून नेलेल्या नऊ मुलींना शोधून नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे. मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ, भरत डंगोरे, सुनील पवार, कॉन्स्टेबल एकनाथ आव्हाड, सोमनाथ कांबळे, पोलीस नाईक रिना म्हस्के, मोनाली घुटे व रूपाली लोहाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जाती व्यवस्थेची प्रथाबहुतांशीवेळा वेगवेगळ्या जातीतील मुला-मुलीचे प्रेम जुळते. आई-वडिलांनी या नात्याला संमती द्यावी अशी त्यांची इच्छा असते. मात्र प्रथा आणि रूढी परंपरेमुळे ग्रामीण भागात आंतरजातीय विवाहाला सहजासहजी मान्यता दिली जात नाही. अशावेळी मुले-मुली पळून जाण्याचा पर्याय निवडतात. एकमेकांमधील आकर्षण संपल्यानंतर मुलींना एकटे सोडून बहुतांशी प्रियकर फरार होतात.८१ मुली, १५ मुलांचा पत्ताच नाहीपळून गेलेल्या अथवा पळवून नेलेल्या ३६४ पैकी २८३ अल्पवयीन मुलींना पोलिसांनी शोधून काढले आहे.  तर १०० पैकी ८५ मुलांना शोधण्यात यश आले. यातील बहुतांशी मुले व मुली पोलिसांना दयनीय अवस्थेत आढळून आल्या. ८१ मुली व १५ मुलांचा गेल्या दीड वर्षात काहीच पत्ता लागलेला नाही. ते कुठे आहेत, काय करतात याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनाही नाही.शाळा-महाविद्यालयात मुला-मुलीकडे पालकांनी लक्ष ठेवावे. ते खरेच शाळेत जातात का? त्यांचे मित्र कोण आहेत याची माहिती घेऊन त्यांच्या दिनक्रमाविषयी माहिती ठेवावी. त्यांच्या मोबाईलकडे लक्ष ठेवावे, कधी शंका आली तर त्यांना समजावून सांगावे. परिणामाची जाणीव करून द्यावी. आंतरजातीय विवाहाचा विषय असेल तर दोन्ही कुटुंबांनी समजूतदारपणे हा सोडवावा. अन्यथा मुला-मुलींच्या प्रेमप्रकरणातून गुन्हेगारीच्या घटनाही घडतात. हे सर्व टाळण्यासाठी पाल्यांना पालकांनी चांगले संस्कार देऊन जबाबदारीची जाणीव करून द्यावी. यातूनच अशा घटनांना आळा बसेल.- घनश्याम पाटील, अप्पर पोलीस अधीक्षकपळून गेलेले, पळविलेले मुले-मुली (२०१७)प्रकार... दाखल गुन्हे...  सापडलेले... न सापडलेलेमुली...... २०७...... १७७...... ३०मुले...... ६०...... ५४...... ६एकूण... २६७...... २३१...... ३६जानेवारी ते २६ जूनपर्यंतप्रकार.... दाखल गुन्हे... सापडलेले.... न सापडलेलेमुली...... १५७...... १०६...... ५१मुले...... ४०...... ३१...... ९एकूण... १९७...... १३७...... ६०

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस