यश रणसिंग यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:21 IST2021-03-05T04:21:52+5:302021-03-05T04:21:52+5:30

------------------- वाहनांना स्क्रॅप करण्याचा कायदा रद्द करण्याची मागणी अहमदनगर : पंधरा वर्षांपुढील वाहनांना स्क्रॅप करणारा कायदा रद्द करण्याची मागणी ...

Yash Ransing felicitated | यश रणसिंग यांचा सत्कार

यश रणसिंग यांचा सत्कार

-------------------

वाहनांना स्क्रॅप करण्याचा कायदा रद्द करण्याची मागणी

अहमदनगर : पंधरा वर्षांपुढील वाहनांना स्क्रॅप करणारा कायदा रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, संजय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष उमेश साठे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट, विजय पाथरे, गणेश ढोबळे, जालिंदर उल्हारे, कैलास साळवे, रमेश शेंडगे, सनी साळवे, भाऊसाहेब साळवे आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारने नवीन कायद्यान्वये पंधरा वर्षांच्या पुढील चारचाकी व दुचाकी वाहन रस्त्यावर चालवता येणार नसून, ते स्क्रॅप करण्याची तरतूद केली आहे. प्रदूषणाचे कारण पुढे करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना दर पंधरा वर्षांनी नवीन वाहन विकत घ्यावे लागणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या असून, त्याद्वारे देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. शेतकरी, कामगार मेहनत करून वाहन खरेदी करतो. शक्य न झाल्यास कमी किमतीत जुने वाहन घेत असतो. मात्र, या कायद्यामुळे गरिबांना दर पंधरा वर्षांनंतर वाहन घेणे परवडणार नाही. त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

--------------

खोसपूरी गावात विविध विकास कामांचा प्रारंभ

अहमदनगर : तालुक्यातील खोसपुरी येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांनी पदभार स्वीकारून गावाच्या प्रलंबित विकासकामांचा शुभारंभ केला. नुकतेच सरपंच नशिबाबी मुबारक पठाण यांनी पदभार घेतल्यानंतर गावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचे काम सुरू केले आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेला पेव्हिंग ब्लॉक बसवून, वॉल कंम्पाऊंड करणे, अंगणवाडी समोरील परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे व सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. नागरगोजे वस्तीसाठी पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाइन मंजूर करण्यात आली. यावेळी सरपंच नशिबाबी मुबारक पठाण, उपसरपंच प्रशांत भालेराव, ग्रामपंचायत सदस्य अविनाश आव्हाड, करीम बेग, कय्यूम शेख, माजी सरपंच सत्तार शेख, अर्जुन आव्हाड, बाबाभाई शेख, प्रवीण आव्हाड आदी उपस्थित होते.

---------------

माजी विद्यार्थ्याकडून पुरस्काराची रक्कम शाळेच्या रंगकामासाठी देणगी

अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गुणवंत सेवक पुरस्कार मिळालेले न्यू आर्टस्, कॉमर्स व सायन्स कॉलेजचे संतोष पोपटराव कानडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मिळालेली बक्षिसाची रक्कम गावाकडील शाळेस रंगकामासाठी मदत दिली. माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी केलेल्या मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. चांदा (ता. नेवासा) येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संतोष कानडे व प्रा. रावसाहेब राशिनकर या दोन माजी विद्यार्थी असलेल्या गुणवंत सेवकांचा सत्कार मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. दीपक शिंदे, नानासाहेब अंबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी प्राचार्य किसन सुकटे, उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक एच. के. जावळे, ज्येष्ठ शिक्षक लहानू ताठे, अर्जुन वैरागर, कलाशिक्षक पोपट मते, अनंता शेळके, सांस्कृतिक विभाग प्रमुख हरीश दगडखैर, राजेश शेंडगे, रुक्मिणी सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शामराव पवार, पंचवटी उद्योग समुहाचे बाळासाहेब जावळे आदी उपस्थित होते.

Web Title: Yash Ransing felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.