पालकमंत्र्यांच्या नाराजी नाट्यावर ‘या’ नेत्यांनी नेत्यांनी शिरूरमध्ये लावली बैठक, तर पालकमंत्री नगरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:57 IST2020-05-21T14:57:00+5:302020-05-21T14:57:10+5:30
अहमदनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शहरासह जिल्ह्यातील काही पदाधिकाºयांनी मध्यंतरी पत्रके काढली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर आले आले होते. ही नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुशराव काकडे यांनी शिरूर येथे बैठक लावली आहे.

पालकमंत्र्यांच्या नाराजी नाट्यावर ‘या’ नेत्यांनी नेत्यांनी शिरूरमध्ये लावली बैठक, तर पालकमंत्री नगरमध्ये
अहमदनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शहरासह जिल्ह्यातील काही पदाधिकाºयांनी मध्यंतरी पत्रके काढली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर आले आले होते. ही नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुशराव काकडे यांनी शिरूर येथे बैठक लावली आहे.
या बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी यांना बोलविण्यात आले आहे. या बैठकीत पालकमंत्र्यांच्या नाराजीबाबतची चर्चा होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ही बैठक शिरूर येथे दीड वाजता सुरू झाल्याचे समजते. या बैठकीसाठी जिल्ह्यातील आमदार व पदाधिकारी शिरडी रवाना झाले आहेत.
दरम्यान पालकमत्र्यांवर होत असलेल्या नाराजीबाबत एकीकडे बैठक सुरू असताना दुसरीकडे मंत्री मुश्रिफ मात्र अहमदनगरला आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीला उपस्थिती लावली. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोवीड सेंटरमधील अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन केले.