शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

कुस्तीपटूचा सराव करताना मृत्यू! आई-वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर; २४ वर्षीय पैलवानाचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 08:57 IST

कुस्तीच्या आखाड्यात नियतीने केले चितपट

प्रकाश महाले, लोकमत न्यूज नेटवर्क राजूर (जि. अहमदनगर) : खेेडेगावात कुस्तीच्या सोयी-सुविधा नाहीत म्हणून थेट हिंगोली जिल्ह्यातून राजूरमध्ये कुस्तीचे धडे घेण्यासाठी आई-वडिलांनी मुलाची पाठवणी केली. मोठ्या मेहनतीने तो कुस्तीचे विविध डावपेच शिकतही होता. काहीशा कुस्त्या जिंकून त्याने कुशलतेची झलकही दाखवली होती. मात्र २४ वर्षीय या मल्लाला नियतीने कुस्तीच्या आराखड्यातच चितपट केले. सोमवारी सरावादरम्यान त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मुलाने कुस्ती क्षेत्रात करिअर करून ऑलिम्पिक स्पर्धेत खेळावे या त्याच्या आई-वडिलांच्या स्वप्नांचाही एका क्षणात चक्काचूर झाला.

पैलवान मच्छिंद्र लक्ष्मण भोईर (२४, मूळ गाव देवठाणा, जि. हिंगोली) असे मृत कुस्तीपटूचे नाव आहे. साई कुस्ती केंद्रातील कुस्तीपटूंचा नावलौकिक ऐकून मच्छिंद्रच्या आई-वडिलांनी त्याला लॉकडाऊनपूर्वी प्रशिक्षणासाठी राजूर येथे दाखल केले होते. उत्कृष्ट शरीरयष्टी, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मच्छिंद्रने काही दिवसांत नावलौकिक मिळवला. भल्याभल्यांना आपल्या कुस्तीच्या डाव-प्रतिडावाने चितपट करणाऱ्या मच्छिंद्रला सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने गाठले आणि नियतीच्या या डावात तो पराभूत झाला.

ती ठरली अखेरची गदा...रविवारी रात्री पारनेर तालुक्यातील साकुर मांडवे येथे आयोजित कुस्ती आखाड्यासाठी मच्छिंद्र सहभागी झाला होता. या आखाड्यातील अंतिम कुस्तीही मच्छिंद्रने प्रतिस्पर्ध्यावर मात करत जिंकली. पंधरा हजार रुपयांच्या रोख रकमेसह चांदीची गदाही आपल्या खांद्यावर घेतली होती.

माहीर मल्लाला मुकलो... तीन शस्त्रक्रियांवर मात करत मच्छिंद्र पुन्हा उभा राहिला होता. अनेक ठिकाणी झालेल्या कुस्त्यांमध्ये मच्छिंद्रने पहिला क्रमांक पटकावला. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने रौप्य पदक मिळवले होते. २१ तारखेला तो आपल्या गावाकडे कुस्ती स्पर्धांसाठी जाणार होता. एका आवडत्या शिष्याला मुकलो. - तानाजी नरके, प्रशिक्षक, साई कुस्ती केंद्र, राजूर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWrestlingकुस्ती