संगमनेर महाविद्यालयात स्वायत्त महाविद्यालयांसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:13 IST2021-02-19T04:13:40+5:302021-02-19T04:13:40+5:30

रुसा म्हणजे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान या केंद्र सरकारच्या संस्थेद्वारे देशभरातील महाविद्यालयांच्या गुणवत्ता संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबविले जातात. रुसा ...

Workshop for Autonomous Colleges at Sangamner College | संगमनेर महाविद्यालयात स्वायत्त महाविद्यालयांसाठी कार्यशाळा

संगमनेर महाविद्यालयात स्वायत्त महाविद्यालयांसाठी कार्यशाळा

रुसा म्हणजे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान या केंद्र सरकारच्या संस्थेद्वारे देशभरातील महाविद्यालयांच्या गुणवत्ता संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबविले जातात. रुसा व संगमनेर महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रुसाचे राज्य सल्लागार डॉ. विजय जोशी यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल शिक्षण प्रसारक संस्था व महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे. रुसाचे महाराष्ट्र राज्य संचालक आयएएस अधिकारी पंकज कुमार यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी समारोपप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत हाँगकाँग विद्यापीठातील प्रा. तेजस्विनी निरंजना, डॉ. लीना वाडिया, रा. पद्मा‌ सारंगपाणी यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

Web Title: Workshop for Autonomous Colleges at Sangamner College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.