जेऊर ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:36+5:302021-05-17T04:19:36+5:30

केडगाव : जेऊर (ता.नगर) येथील ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्य कौतुकास्पद असून काही नागरिकांकडून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू ...

The work of the village level officers is commendable | जेऊर ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद

जेऊर ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद

केडगाव : जेऊर (ता.नगर) येथील ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्य कौतुकास्पद असून काही नागरिकांकडून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निवेदन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले आहे. जेऊर येथील ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांबद्दल काही नागरिकांनी तनपुरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देऊन खुलासा करण्यात आला आहे. जेऊर येथील ग्रामविकास अधिकारी, तलाठी व वैद्यकीय अधिकारी यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामकाजाबद्दल नागरिकांची कोणतीही तक्रार नाही तरीही काही लोकांकडून जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोविड सेंटरही व्यवस्थितपणे सुरू असून त्याबाबत गैरसमज तयार करण्यात येत आहेत. कोविड सेंटर गावच्या मध्यवस्तीत येत असल्याने कोविड सेंटर गावाच्या बाहेर हलविण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.

160521\img-20210516-wa0182.jpg

जेऊर फोटो

Web Title: The work of the village level officers is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.