संगमनेरातील शिक्षकांचे कार्य राज्याला दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:28+5:302021-06-21T04:15:28+5:30
संगमनेर पंचायत समितीचा शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेच्या संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या पुढाकारातून चंदनापुरी येथील सिंधू लॉन्समध्ये विविध ...

संगमनेरातील शिक्षकांचे कार्य राज्याला दिशादर्शक
संगमनेर पंचायत समितीचा शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेच्या संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या पुढाकारातून चंदनापुरी येथील सिंधू लॉन्समध्ये विविध सुविधायुक्त कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. येथे ५०३ रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी परतले. त्यासाठी विशेष योगदान देणाऱ्यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मान करत शनिवारी (दि. २०) या सेंटरचा समारोप करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. तांबे बोलत होते. लॉन्स मोफत उपलब्ध करून देणारे सिंधू लॉन्सचे संचालक नरेंद्र रहाणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख इंद्रजीत थोरात, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय फटांगरे, महिला व बालकल्याण सभापती मीरा शेटे, सदस्य मिलिंद कानवडे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, सदस्य अशोक सातपुते, विष्णुपंत राहटळ, तहसीलदार अमोल निकम, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश घोलप, गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी, शिक्षण विस्तार अधिकारी के. के. पवार, आर. पी. रहाणे, चंदनापुरीचे सरपंच शंकर रहाणे, उपसरपंच भाऊराव रहाणे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शार्दुल देशमुख, महिला काँग्रेस अध्यक्ष अर्चना बालोडे, सोमनाथ गुंजाळ, संतोष मांडेकर, विजय रहाणे, सुवर्णा फटांगरे, कैलास धोत्रे, दशरथ धाडवड, प्रभाकर रोकडे, शिवनाथ पारधी, जिल्हा शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष राजू रहाणे, भाऊराव राहिंज, सोमनाथ मदने, अशोक शेटे आदी यावेळी उपस्थित होते.