शिक्षक बँकेचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST2020-12-13T04:36:11+5:302020-12-13T04:36:11+5:30
अहमदनगर : देशभरातील बँका मेलेल्या माणसाचे कर्ज वसूल करीत असताना शिक्षक बँक मृत्यू पावलेल्या सभासदाचे ३३ लाख रुपयांचे कर्ज ...

शिक्षक बँकेचे कार्य कौतुकास्पद
अहमदनगर : देशभरातील बँका मेलेल्या माणसाचे कर्ज वसूल करीत असताना शिक्षक बँक मृत्यू पावलेल्या सभासदाचे ३३ लाख रुपयांचे कर्ज माफ करते. शिवाय पंधरा लाख रुपये त्या कुटुंबीयांना मदत म्हणून देते. हे अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रतन साळवे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. शिक्षक बँकेतर्फे साळवे कुटुंबीयांना कुटुंब आधार निधी व सभासद कल्याण निधी मिळून १५ लाख रुपयांचा धनादेश तसेच शिक्षक भारती व साळवे यांच्या केंद्रातील शाळेतील शिक्षकांनी जमा केलेले रकमेचा धनादेश आमदार कपिल पाटील हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षक बँकेच्या सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, उपाध्यक्ष दिनेश खोसे, जिल्हाध्यक्ष मुकेश गडदे, सरचिटणीस सुनील मते, महिला अध्यक्ष उषा येणारे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष राजू राहणे, उपाध्यक्ष उषा बनकर, बँक शताब्दी समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण, माजी अध्यक्ष संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, शरद सुद्रिक, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय कुलट, माध्यमिक सोसायटीचे नेते भाऊसाहेब कचरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दिनेश खोसे यांनी केले. आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठाणचे संस्थापक चाँद शेख यांनी सूत्रसंचालन करून भूमिका मांडली.
.....................१२ कपिल पाटील