साइडपट्ट्यांचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:19 IST2021-01-18T04:19:56+5:302021-01-18T04:19:56+5:30

..... थंडी गायब अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील उकाडा वाढला असून, थंडी गायब झाली आहे. त्यामुळे गहू व ...

Work on the sidebars continues | साइडपट्ट्यांचे काम सुरू

साइडपट्ट्यांचे काम सुरू

.....

थंडी गायब

अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील उकाडा वाढला असून, थंडी गायब झाली आहे. त्यामुळे गहू व हरभराला पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. थंडी ओसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

...

खडी टाकून ठेकेदार गायब

अहमदनगर: महापालिकेच्या वतीने रस्त्यांतील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सिव्हिल हडको परिसरातील रस्त्यांतील खड्ड्यांत खडी टाकण्यात आली आहे, परंतु त्यावर डांबर न टाकताच ठेकेदार गायब झाला असून, खडीवर वाहने घसरून अपघात होत आहेत.

...

मनपा कर्मचाऱ्यांचा स्वच्छतेला खो

अहमदनगर: महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यास सांगण्यात आले आहे. सामान्य प्रशासनाकडून तसा आदेश काढण्यात आला आहे. मात्र, कर्मचारी सकाळी शहरात फिरकत नसल्याचे समोर आले असून, स्वच्छता मोहिमेला कर्मचाऱ्यांनी खो दिला आहे.

Web Title: Work on the sidebars continues