शहापूर घोटी राज्यमार्गाचे काम लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:53+5:302021-02-05T06:40:53+5:30
आमदार लहू कानडे : तालुक्याच्या विकासाला मिळणार गती श्रीरामपूर : श्रीरामपूर मार्गे नेवासेला जाणाऱ्या शहापूर घोटी या राज्यमार्गाचे काम ...

शहापूर घोटी राज्यमार्गाचे काम लवकरच
आमदार लहू कानडे : तालुक्याच्या विकासाला मिळणार गती
श्रीरामपूर : श्रीरामपूर मार्गे नेवासेला जाणाऱ्या शहापूर घोटी या राज्यमार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली. श्रीरामपूर प्रथमच राज्यमार्गाला जोडले जात असून त्यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास कानडे यांनी व्यक्त केला.
शहापूर, घोटी, राजूर, अकोले, संगमनेर, लोणीहून हा राज्यमार्ग श्रीरामपूर शहराला जोडला जाणार आहे. या राज्यमार्गाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाची ई निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामास प्रारंभ होईल, असे कानडे यांनी सांगितले. शहापूर, घोटी, राजूर, अकोले, संगमनेर, लोणी, श्रीरामपूर ते नेवासा या ११७ किलोमीटर राज्यमार्गाचे हे काम आहे. त्यासाठी १२५ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यावर पुलाची कामे केली जाणार आहेत. कोल्हार, बेलापूर, बेलपिंपळगाव या ८१ किलोमीटर रस्त्याचे काम तसेच कोपरगाव, पुणतांबा व बेलापूर ते राहुरी फॅक्टरी या रस्त्याच्या कामाचा निविदेत समावेश आहे. राहाता, चितळी, निमगाव खैरी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणदेखील केले जाईल, असे कानडे यांनी म्हटले आहे.
------------
तालुक्यातील अन्य रस्त्यांना मंजुरी
पुणतांबा, नाऊर, माळेवाडी तसेच घुमनदेव, घोगरगाव या रस्त्याचे काम केले जाणार आहे. शहरातील नगरपालिका हद्दीतील मौलाना आझाद चौक ते नेहरुनगरपर्यंतचा रस्ता, तसेच झिरंगे वस्ती ते साई भुयारी मार्ग व गोपीनाथनगरपर्यंतचा रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू होईल. अन्यकाही प्रभागांमध्येही रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे कानडे यांनी सांगितले.