कुकडीचा कालवा बुजविण्याचे काम युद्धपातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 00:59 IST2016-04-23T00:33:20+5:302016-04-23T00:59:40+5:30
कर्जत : तालुक्यातील नांदगाव येथे नांदणी ओढ्यावर फुटलेला कुकडीचा मुख्य कालवा बुजविण्यासाठी कुकडी विभागाच्या अधिकाऱ्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

कुकडीचा कालवा बुजविण्याचे काम युद्धपातळीवर
कर्जत : तालुक्यातील नांदगाव येथे नांदणी ओढ्यावर फुटलेला कुकडीचा मुख्य कालवा बुजविण्यासाठी कुकडी विभागाच्या अधिकाऱ्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, एकेरी रस्ता व चिखल याचा कामात व्यत्यय येत आहे.
नांदगाव शिवारात नांदणी ओढ्यावर कुकडीचा मुख्य कालवा गुरुवारी फुटला. यामुळे करमाळा तालुक्यातील मांगी तलावात जाणारे कुकडीचे पाणी बंद करण्यात आले आहे. कर्जत व करमाळा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. त्या दृष्टीने हा फुटलेला कालवा तत्काळ दुरुस्त करण्याचे काम कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता बी. आर. बोकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतले आहे. या कामासाठी पाच ट्रॅक्टर, तीन जेसीबी, तीन टिपर व मजूर हे काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. प्रांत अधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार किरण सावंत यांनी या कामाची पाहणी केली. ज्या ठिकाणी कालवा फुटला, तेथे रस्ता नाही. त्यामुळे कॅनॉल पट्टीवरूनच एकेरी वाहतूक करावी लागते.