राजहंस दूध संघाचे काम कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:55+5:302021-03-24T04:18:55+5:30
संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अनेक खासगी दूध उत्पादक संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी बंद केली होती. मात्र, ...

राजहंस दूध संघाचे काम कौतुकास्पद
संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अनेक खासगी दूध उत्पादक संस्थांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी बंद केली होती. मात्र, राजहंस सहकारी दूध संघाने एकही दिवस बंद न ठेवता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांच्याकडून दूध खरेदी केले. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या राजहंस दूध संघाचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रविवारी (दि. २१) संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या ४३व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत मंत्री थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख होते. आमदार डॉ.सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड.माधवराव कानवडे, थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संचालक इंद्रजीत थोरात यांच्यासह शिवाजीराव थोरात, शंकरराव खेमनर, गणपतराव सांगळे, संपतराव डोंगरे, साहेबराव गडाख, भारत मुंगसे, अजय फटांगरे, प्रतापराव शेळके, आर.बी. राहणे, चंद्रकांत कडलग, सुभाष गुंजाळ, गणेश मादास, दत्तू खुळे, मधुकर गुंजाळ, संघाचे कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे, जी.एस. शिंदे उपस्थित होते.
महसूलमंत्री थोरात म्हणाले, लॉकडाऊन झाल्याने दूध व्यवसायावर मोठा परिणाम झाला. मात्र, राजहंस दूध संघाची सर्वसामान्य शेतकऱ्यांशी बांधिलकी आहे. त्यामुळे संकटाच्या काळातही संघाने दुधाला पंचवीस रुपये प्रती लीटर इतका उच्चांकी भाव दिला, असेही ते म्हणाले.
दूध संघाचे संचालक मोहनराव करंजकर, भास्करराव सिनारे, विलासराव वर्पे, गंगाधर चव्हाण, बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, अण्णासाहेब राहींज, पांडुरंग सागर, माणिक यादव, प्रतिभा जोंधळे, तारा धुळगंड, राजेंद्र चकोर, सुभाष आहेर, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, दादासाहेब कुटे, तात्याराम कुटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड.सुरेश जोंधळे, नामदेव कहांडळ यांनी केले. उपाध्यक्ष साहेबराव गडाख यांनी आभार मानले.