वाचन संस्कृती जोपासण्याचे काम ग्रंथालयाच्या माध्यमातून होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:04+5:302021-08-13T04:25:04+5:30
कोपरगाव : आजच्या डिजिटल युगामध्येदेखील वाचनसंस्कृती जोपासण्याचे काम ग्रंथालयांच्या माध्यमातून केले जात आहे. येथे हजारो ग्रंथ आणि मासिकांबरोबरच अनेक ...

वाचन संस्कृती जोपासण्याचे काम ग्रंथालयाच्या माध्यमातून होते
कोपरगाव : आजच्या डिजिटल युगामध्येदेखील वाचनसंस्कृती जोपासण्याचे काम ग्रंथालयांच्या माध्यमातून केले जात आहे. येथे हजारो ग्रंथ आणि मासिकांबरोबरच अनेक ई-ग्रंथ व ई-जर्नल्स उपलब्ध आहेत. वाचनाने माणसाचे आंतरिक व्यक्तिमत्त्व विकसित होते, असे मत प्रा. डॉ. पी. जी. जोशी यांनी व्यक्त केले.
कोपरगाव शहरातील स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्यावतीने गुरुवारी ( दि. १२ ) 'ग्रंथालय-दिना' च्या निमित्त ज्येष्ठ नागरिकांची सभा पार पडली. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. जोशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस यादव होते.
जोशी म्हणाले की, सुसंस्कृत आणि सभ्य समाजाच्या निर्मितीसाठी औपचारिक शिक्षणाबरोबरच निरंतर वाचन आवश्यक असते, याचसाठी ग्रंथालय शास्त्राचा विकास झाला. देशात व एकूणच जगात सर्वसामान्यांसाठी ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करून वाचन संस्कृती रुजविण्याचे कार्य ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. टी. आर. पाटील, डॉ. निर्मला कुलकर्णी, विलास नाईक, संभाजी नाईक, शरद घाटे, अशोक आढाव, बी. आर. शिंदे, सुभाष बनकर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. नीता शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय विभागाचे बाळासाहेब पानगव्हाणे, स्वप्निल आंबरे, रवींद्र रोहमारे व अविनाश शिंदे यांनी परिश्रम घेतले.