राहाता(अहमदनगर) : शहरात दारुबंदीकरीता महिलांनी राहाता नगर पालिकेवर मोर्चा काढला. राहाता शहरातून दारु हद्दपार करा या घोषणांनी नगरपालिका कार्र्यालय परिसर दणाणून सोडला. यावेळी मागण्यांचे निवेदन राहाता नगरपालिकेच्या नगरअध्यक्षांना देण्यात आले. यावेळी डॉ.राजेद्र पिपाडा, धंनजय गाडेकर, नगरसेविका निलम सोळंकी, शारदा गिधाड, अनिता काळे, विमल आरणे, नगरसेवक सचिन मेहञे, निवुत्ती गाडेकर यांच्यासह बाळासाहेब गिधाड, नवनाथ सदाफळ, राजेश लुटे, दिपक सोळंकी, अभिजीत काळे उपस्थित होते .शहरात दारु दुकानांकरीता मंदीर परिसर, शहीद स्मारक व लोकवस्तीत परवानगी देऊ नये या मागणीचे निवेदन दोन दिवसापुर्वी देण्यात आले होते. यानंतर आज राहाता नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाच्या नगरसेविकाच्या नेतुत्वाखाली हुतात्मा अनिलकुमार स्मारकापासून घोषणा देत राहाता पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
राहाता शहरात दारुबंदीकरीता पालिकेवर महिलांचा मोर्चा
By admin | Updated: July 5, 2017 14:25 IST