विहिरीत महिलेचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 18:08 IST2017-08-19T18:08:37+5:302017-08-19T18:08:37+5:30
बोटा (ता. संगमनेर)परिसरातील एका विहरीत २७ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी सापडला. याबाबत घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विहिरीत महिलेचा मृतदेह सापडला
ब टा : बोटा (ता. संगमनेर)परिसरातील एका विहरीत २७ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी सापडला. याबाबत घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोटा परिसरातील कारवाडी येथून सुरेखा उर्फ मंगल सचिन मुसळे (वय २७)ही विवाहित महिला गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास घरातून निघून गेली होती. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलीस व नातेवाईक यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र कुठेही शोध लागला नाही. अखेर शनिवारी सकाळच्या वेळेला याच परिसरातील एका विहिरीत सुरेखा उर्फ मंगल मुसळेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मनोज मुसळे यांनी घारगाव पोलिसांत याप्रकरणी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.विहिरीत महिलेचा मृतदेह सापडलाबोटा : बोटा (ता. संगमनेर)परिसरातील एका विहरीत २७ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी सापडला. याबाबत घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोटा परिसरातील कारवाडी येथून सुरेखा उर्फ मंगल सचिन मुसळे (वय २७)ही विवाहित महिला गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास घरातून निघून गेली होती. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलीस व नातेवाईक यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र कुठेही शोध लागला नाही. अखेर शनिवारी सकाळच्या वेळेला याच परिसरातील एका विहिरीत सुरेखा उर्फ मंगल मुसळेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मनोज मुसळे यांनी घारगाव पोलिसांत याप्रकरणी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.