प्रसूती झालेल्या महिलांना जमिनीवर झोपावे लागते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST2021-09-06T04:25:26+5:302021-09-06T04:25:26+5:30

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णकल्याण समितीच्या नूतन सदस्य मंडळाची बैठक नुकतीच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात पार ...

Women who have given birth have to lie on the ground | प्रसूती झालेल्या महिलांना जमिनीवर झोपावे लागते

प्रसूती झालेल्या महिलांना जमिनीवर झोपावे लागते

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णकल्याण समितीच्या नूतन सदस्य मंडळाची बैठक नुकतीच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या संगीता गांगुर्डे होत्या. पंचायत समिती सदस्या वंदना मुरकुटे, सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, सदस्या अर्चना पवार, मनीषा नवले, आबासाहेब रणनवरे, चंद्रकांत लांडगे, तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे उपस्थित होते.

खंडागळे म्हणाले, आरोग्य केंद्रातील कर्मचारी व अधिकारी यांचे साफसफाई व स्वच्छतेकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीच्या कोविड सेंटरमधील काही बेड आरोग्य केंद्रात स्वखर्चाने आपणास पोहोच करावे लागले. पंचायत समितीच्या सदस्या डॉ.वंदना मुरकुटे म्हणाल्या, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अडचण येत असलेल्या गोष्टींबद्दल लेखी पत्र देऊन मागणी करावी व त्याचा पाठपुरावाही करावा. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. राम बोरुडे यांच्या मागणीनुसार आणखी एक शिपाई पूर्ववत नियुक्त करण्यात आला. एक दिवसाआड शिपाई काम करेल अशी सूचना तालुका आरोग्याधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव, डॉ.बोरुडे, डॉ. केदारी, आरोग्य कर्मचारी श्रीमती तोरणे आदींसह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Women who have given birth have to lie on the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.