रिकामे हंडे घेऊन महिलांची महापालिकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:34+5:302021-02-05T06:31:34+5:30

या आंदोलनात युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, डॉ. रिजवान शेख, युवक ...

Women take empty pots and sit in the Municipal Corporation | रिकामे हंडे घेऊन महिलांची महापालिकेत ठिय्या

रिकामे हंडे घेऊन महिलांची महापालिकेत ठिय्या

या आंदोलनात युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, डॉ. रिजवान शेख, युवक काँग्रेसचे गणेश भोसले, योगेश काळे, देवेंद्र कडू, शिवाजी जाधव, रोहन काकडे, अमित थोरात, संगीता क्षेत्रे, पुष्पा जाधव, कांचन वाघमारे, सुनील वाघमारे, बी. बी. पगारे, रेखा अल्हाट, पुष्पा जाधव, कांचन वाघमारे आदींसह नागरिक उपस्थित होते.

बिशप लॉइड कॉलनीत पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असताना, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका या प्रश्‍नाकडे दखल घेत नसल्याने नागरिकांनी आंदोलन करून महापालिकेत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी मनपा प्रशासन, नागरिक आणि कार्यकर्त्यांचा समन्वय साधून सदर प्रश्‍नावर लवकरच बैठक घेऊन पाणीप्रश्‍न सोडविण्याचे स्पष्ट केले. उपायुक्त प्रदीप पठारे यांनी निवेदन स्वीकारून पाणीप्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत सदर भागाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले.

फोटो २५ आंदोलन

ओळी- बिशप लॉइड कॉलनीतील पाणीप्रश्‍न सोडवावा, या मागणीसाठी नागरिकांनी रिकामे हंडे घेऊन आंदोलन केले.

Web Title: Women take empty pots and sit in the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.