महिलांनी फोडली लाखाची दहीहंडी...
By Admin | Updated: August 25, 2016 23:37 IST2016-08-25T23:36:22+5:302016-08-25T23:37:49+5:30
महिलांनी फोडली लाखाची दहीहंडी...

महिलांनी फोडली लाखाची दहीहंडी...
पाथर्डी येथील एकात्मता मंडळाच्यावतीने आयोजित दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई येथील महिलांच्या पथकाने दहीहंडी फोडून १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस पटकावले़ मंडळाचे अध्यक्ष दत्ता आरगडे, अॅड़ प्रताप ढाकणे, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, अनिल कराळे, कल्याण एकशिंगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले़
शिल्पा शेट्टी यांची साद़़
प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे एस़टी़ बसस्थानक चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते़ अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्यात आली़ त्यांनी नगरकरांना साद घालताच चाहत्यांनी जल्लोष केला़ यावेळी शिल्पा शेट्टी यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती़ आमदार संग्राम जगताप यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते़ मुंबईच्या जय भगवान पथकाने दहीहंडी फोडून १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस पटकावले़