३७ ग्रामपंचायतीवर महिला राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:29+5:302021-02-05T06:40:29+5:30
कोपरगाव : तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींची सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी (दि.२८) तहसील कार्यालयात प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे ...

३७ ग्रामपंचायतीवर महिला राज
कोपरगाव : तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींची सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी (दि.२८) तहसील कार्यालयात प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आली. या सोडतीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३४ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग २०, अनुसूचित जाती ११ व अनुसूचित जमाती १० अशा एकूण ७५ गावाच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झाली. यात ३७ ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे.
अनुसूचित जाती : कारवाडी, डाऊच बुद्रूक, मंजूर, मायगाव देवी, शिंगणापूर.
अनुसूचित जाती स्त्री : चासनळी, तिळवणी, मढी खुर्द, कोकमठाण, माहेगाव देशमुख.
अनुसूचित जमाती : कान्हेगाव, रवंदे, जेऊर कुंभारी, दहिगाव बोलका, कासली, देर्डे कोऱ्हाळे.
अनुसूचित जमाती स्त्री : पोहेगाव बुद्रूक, शहजापूर, येसगाव, वेस-सोयगाव, ओगदी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : सांगवी भुसार, कोळगाव थडी, हंडेवाडी, करंजी बुद्रूक, देर्डे चांदवड, अंचलगाव, लौकी, मुर्शदपूर, मनेगाव, चांदेकसारे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री : आपेगाव, सडे, मोर्वीस, चांदगव्हाण, घोयेगाव, शहापूर, कोळपेवाडी, गोधेगाव, डाऊच खुर्द, रांजणगाव देशमुख. सर्वसाधारण : घारी, बोलकी, हिंगणी, काकडी, धोत्रे, भोजडे, वडगाव, खिर्डीगणेश, शिरसगाव - सावळगाव, सोनारी, धोंडेवाडी, बहादरपूर, नाटेगाव, मढी बुद्रूक, ब्राह्मणगाव, टाकळी, धामोरी.
सर्वसाधारण स्त्री : खोपडी, बक्तरपूर,कुंभारी, तळेगाव मळे, जवळके, बहादराबाद, वारी, धारणगाव, उक्कडगाव,अंजनापूर, वेळापूर, सुरेगाव, पढेगाव, जेऊर पाटोदा, संवत्सर, सोनेवाडी, मळेगाव थडी.
...........
या आरक्षणाचे सरपंच पदासाठी सदस्यच नाहीत..
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत येसगाव व तिळवणी या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची चिठ्ठीनुसार सोडत झाली. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठीचे आरक्षण निघाले. मात्र, या दोनही ग्रामपंचायतीमध्ये या प्रवर्गातून एकही महिला सदस्य म्हणून निवडून आलेली नाही. त्यामुळे या आरक्षण सोडतीसंदर्भात पुढे काय करायचे यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे मार्गदर्शन मागवून पुढील निर्णय घेण्यात येईल असे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.
..........
चिठ्ठीमुळे हुकले सरपंच पद
३४ ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत झाली होती. त्यापैकी १७ ग्रामपंचायतीसाठी महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले होते. त्यानुसार २०१५ च्या सरपंच पदाच्या सोडतीमध्ये सरपंचपद हे महिलासाठी राखीव नव्हते अशा १६ ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण जाहीर करण्यात आले. उर्वरित एका ग्रामपंचायतीच्या महिला आरक्षणासाठी राहिलेल्या १८ ग्रामपंचातीच्या चिठ्या टाकण्यात आल्या. त्यातून इयत्ता सहावीत शर्विल कुणाल बाविस्कर याने काढलेल्या एका चिठ्ठीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील संवत्सर ग्रामपंचायतीचे नाव निघाले. आणि तेथील सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले. त्यामुळे विवेक परजणे यांची सरपंच पदाची संधी एका चिठीमुळे हुकली.
................
सोडतीसाठी एकही महिला गैरहजर
तालुक्यात नुकत्याच झालेल्या २९ ग्रामपंचायतीचे देखील सरपंच पदाची आरक्षण सोडत होती. या निवडणुकीत एकूण २७९ सदस्य निवडून आले आहेत. विशेष म्हणजे यात ५० टक्क्यांपर्यंत महिला सदस्य आहेत. मात्र, गुरुवारी झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीसाठी २९ ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेली एकही महिला सदस्य उपस्थित नव्हती. त्यामुळे आजही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर महिला फक्त रिकाम्या जागा भरण्यासाठीच तर नाहीना ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
......................
फोटो२८- आरक्षण सोडत फोटो - कोपरगाव
280121\0_img_20210128_182919.jpg
कोपरगाव येथे तहसील कार्यालयात शर्विल बाविस्कर याने चिठ्ठी काढून काही गावांचे सरपंच पदाचे आरक्षण काढले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे.