महिला धास्तावल्या

By Admin | Updated: September 25, 2014 00:51 IST2014-09-24T23:55:56+5:302014-09-25T00:51:44+5:30

अहमदनगर: गौरी-गणपतीच्या काळात एकाच दिवशी एकाच तासामध्ये नऊ महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेल्यामुळे नवरात्रौत्सवामध्ये दागिने घालून फिरण्याबाबत महिला धास्तावल्या आहेत.

Women are afraid | महिला धास्तावल्या

महिला धास्तावल्या

अहमदनगर: गौरी-गणपतीच्या काळात एकाच दिवशी एकाच तासामध्ये नऊ महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेल्यामुळे नवरात्रौत्सवामध्ये दागिने घालून फिरण्याबाबत महिला धास्तावल्या आहेत. दुसरीकडे मंगळसूत्र चोरांची पोलिसांनीही धास्ती घेतली आहे.
घटस्थापना ते विजयादशमी आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवीचा उत्सव सुरू राहणार आहे. त्यामुळे १३ दिवस महिलांची देवीच्या दर्शनासाठी गर्दी राहणार आहे. देवीच्या दर्शनाला जाताना महिला मोठ्या प्रमाणात दागिने घालून जातात. देवीच्या दर्शनाला जाताना डुप्लीकेट मंगळसूत्र घालण्याची महिलांची मानसिकता नसते. त्यामुळे दागिने घालून देवीच्या दर्शनासाठी कसे जायचे, अशी धास्तीच महिलांना बसली आहे. शहरात एकापाठोपाठ होणाऱ्या मंगळसूत्र चोरी, घरफोडीच्या घटना पाहता महिलांनी चोरट्यांची चांगलीच धास्ती घेतली आहे.
नवरात्रौत्सवाच्या काळात शहरात चौकाचौकात आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट देण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी एक पोलीस नियुक्त करण्यात आला आहे. तसेच पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. देवीच्या मंदिराभोवतीही पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

Web Title: Women are afraid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.