महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST2021-01-25T04:21:49+5:302021-01-25T04:21:49+5:30

ट्रकचालकांना मारहाण करून पैसे लुटले अहमदनगर : राहुरी फॅक्टरीजवळ असलेल्या ढाब्याजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या दोघा ट्रकचालकांवर तिघा लुटारूंनी हल्ला करून ...

The woman's mangalsutra orbadale | महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले

महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले

ट्रकचालकांना मारहाण करून पैसे लुटले

अहमदनगर : राहुरी फॅक्टरीजवळ असलेल्या ढाब्याजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या दोघा ट्रकचालकांवर तिघा लुटारूंनी हल्ला करून त्यांच्याकडील १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. २३ जानेवारी रोजी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात संतोष बाबासाहेब कटारे (वय ३०, रा. हिलालपूर, ता. वैजापूर, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक निरीक्षक शिंदे हे पुढील तपास करत आहेत.

दूध संकलन केंद्र फोडून साहित्य चोरले

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील उंबरे येथे चोरट्यांनी दूध संकलन केंद्र फोडून ४७ हजार रुपयांचे सहित्य चोरून नेले. २२ ते २३ जानेवारीदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी सुनील अण्णासाहेब ढोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल बर्हाटे हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: The woman's mangalsutra orbadale