महिलेचे हरवलेले दागिने मिळाले काही तासांतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:09+5:302021-09-13T04:20:09+5:30
तृप्ती अमोल घाडगे (ता. तळोजा, पनवेल) या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या बहिणीसोबत शहरातील झोपडी कँटीन जवळील एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. ...

महिलेचे हरवलेले दागिने मिळाले काही तासांतच
तृप्ती अमोल घाडगे (ता. तळोजा, पनवेल) या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या बहिणीसोबत शहरातील झोपडी कँटीन जवळील एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. यावेळी तृप्ती यांच्याकडील पर्स गहाळ झाली. या पर्समध्ये अडीच तोळ्यांचे दागिने व काही रोख रक्कम होती. याबाबत तृप्ती घाडगे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात माहिती दिली. यावेळी निरीक्षक गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंके, कॉन्स्टेबल शकील सय्यद, शैलेश गोमसाळे, अमोल शिरसाठ, अकीब इनामदार यांच्या पथकाने अवघ्या काही तासांतच ही पर्स शोधून काढली. दागिन्यासह हरवलेली पर्स काही तासांतच परत मिळाल्याने तृप्ती घाडगे व त्यांच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले.
.................
फोटो १२ तोफखाना
ओळी - पोलिसांनी शोधून काढलेली दागिन्यांची पर्स पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते तृप्ती घाडगे यांना देण्यात आली. यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी.