रुग्णालयात महिलेच्या दागिन्यांवर डल्ला
By Admin | Updated: May 11, 2016 23:57 IST2016-05-11T23:51:22+5:302016-05-11T23:57:14+5:30
अहमदनगर : येथील श्रीदीप हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या महिलेच्या अंगावरील २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

रुग्णालयात महिलेच्या दागिन्यांवर डल्ला
अहमदनगर : येथील श्रीदीप हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या महिलेच्या अंगावरील २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. रुग्णालयाच्या तंत्रज्ञाविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुबिना गफार शेख (वय २४, रा. रोशनपुरा, बालेपीर, बीड) या श्रीदीप हॉस्पिटलमध्ये कमरेचा व छातीचा एक्स-रे काढण्यासाठी आल्या होत्या़ तंत्रज्ञ शिवाजी गायकवाड आणि स्टाफने एक्स-रे काढण्यापूर्वी त्यांना अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार शेख यांनी त्यांचा सोन्याचा २० हजार रुपये किमतीचा नेकलेस व अन्य वस्तू बाजूला काढून ठेवल्या. एक्स-रे काढल्यानंतर त्यांचा नेकलेस जागेवर आढळून आला नाही. याबाबत त्यांनी चौकशी केली, मात्र तो त्यांना सापडला नाही. गायकवाड व रुग्णालयातील स्टाफनेच नेकलेस चोरल्याचा संशय व्यक्त केल्याने शेख यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.