महिलेची गाय चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST2020-12-27T04:16:24+5:302020-12-27T04:16:24+5:30

प्रवासादरम्यान महिलेचे दागिने चोरले अहमदनगर: प्रवासादरम्यान चोरट्याने महिलेचे २ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना २३ ...

The woman's cow was stolen | महिलेची गाय चोरली

महिलेची गाय चोरली

प्रवासादरम्यान महिलेचे दागिने चोरले

अहमदनगर: प्रवासादरम्यान चोरट्याने महिलेचे २ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना २३ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी शहाबाई भीमराव जायभाये यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस हेड कॉस्टेबल राख हे तपास करत आहेत.

शेतकऱ्याचे वीजपंप चोरले

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील कासारपिंपळगाव येथे चोरट्यांनी शेतकऱ्याच्या वहिरीतून दोन वीजपंप चोरून नेले. २० ते २१ डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी मारुती मोहन दारकुंडे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हेड कॉस्टेबल तांबे हे पुढील तपास करत आहेत.

तरुणाला मारहाण करून मोपेड चोरली

अहमदनगर: शहरातील आरणगाव ते केडगाव रोडवर चार जणांनी तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील मोपेड गाडी चोरून नेली. २३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संदीप मच्छिंद्र वाघ (वय ३५, रा. खंडाळा ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पवार हे तपास करीत आहेत.

Web Title: The woman's cow was stolen