पत्नीवर बंदुकीची गोळी झाडणा-या पतीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 19:03 IST2017-08-28T18:52:32+5:302017-08-28T19:03:59+5:30
कौटुंबिक वादातून पत्नीवर बंदुकीची गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार तालुक्यातील कोकमठाण येथे रविवारी दुपारी घडला. याप्रकरणी पती सुनील विश्वनाथ रक्ताटे (वय ४०), रा. कोकमठाण यांच्याविरूध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीवर बंदुकीची गोळी झाडणा-या पतीस अटक
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कौटुंबिक वादातून पत्नीवर बंदुकीची गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार तालुक्यातील कोकमठाण येथे रविवारी दुपारी घडला. याप्रकरणी पती सुनील विश्वनाथ रक्ताटे (वय ४०), रा. कोकमठाण यांच्याविरूध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची माहिती अशी की, सुनील रक्ताटे याचे पत्नी माधुरी यांच्याबरोबर कौटुंबिक वाद सुरू होते. दरम्यान रविवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी रागाच्या भरात स्वत:कडील बंदुकीतून पत्नी माधुरी हिच्यावर गोळी झाडून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्यावर संशय येवू नये म्हणून जखमी झालेल्या पत्नीस उपचारासाठी एका खासगी हॉस्पीटलमध्ये नेले. याप्रकरणी रविंद्र अंबादास कदम, रा. पाचचारी, रवंदे (ता. कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी रक्ताटे यांच्याविरूध्द बेकायदा शस्त्र बाळगून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी करीत आहेत.