पावसामुळे मातीचे छत पडून वृद्धेचा मृत्यू
By Admin | Updated: July 11, 2016 23:52 IST2016-07-11T23:31:57+5:302016-07-11T23:52:22+5:30
राहाता : पावसामुळे मातीच्या घराचे छत अंगावर पडून राहाता येथील वृद्ध महिला ठार झाली. रविवारी रात्री ही घटना घडली. शांताबाई दशरथ सदाफळ (वय ७२) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

पावसामुळे मातीचे छत पडून वृद्धेचा मृत्यू
राहाता : पावसामुळे मातीच्या घराचे छत अंगावर पडून राहाता येथील वृद्ध महिला ठार झाली. रविवारी रात्री ही घटना घडली.
शांताबाई दशरथ सदाफळ (वय ७२) असे मृत वृद्धाचे नाव आहे. रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होता. राहाता तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली.
शांताबाई ही घरी एकटीच राहत होती. अतिशय अरुंद बोळीत तिचे घर होते. भीज पावसामुळे भिंतीत तसेच छतात पाणी मुरून रविवारी रात्री मातीचे छत कोसळले. त्याखाली दबून शांताबाई हिचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांना सोमवारी सकाळी ही बाब लक्षात आली. वृद्धेचे नातेवाईक सोपान बाळासाहेब सदाफळ यांनी पोलिसांना खबर दिली. राहाता नगरपालिका कर्मचाऱ्यांनी मातीचा ढिगारा बाजूला करून मृतदेह बाहेर काढला. राहाता पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
(वार्ताहर)
रेल्वेतून पडून एक ठार
कोपरगाव : रेल्वेगाडीतून पडून एक अनोळखी पुरुष ठार झाल्याची घटना कोपरगाव-मनमाड रेल्वेमार्गावर घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोपरगाव रेल्वे स्टेशनजवळ एक अंदाजे ३० वर्षे वयाचा अनोळखी पुरूष चालत्या रेल्वेगाडीतून खाली पडल्याने डोक्याला मार लागून जागीच ठार झाला.
घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. उंची ५ बाय ५, रंग काळा-सावळा, बांधा सडपातळ, सरळ नाक, बारीक डोळे, काळे केस, लांबट चेहरा, अंगात लाल रंगाचा टी शर्ट व तपकिरी रंगाची जुनी पॅण्ट असे मयताचे वर्णन आहे. याप्रकरणी कोपरगाव रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शरद डावरे हे करीत आहेत.
(प्रतिनिधी)