शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

फिर्याद मागे घेण्यासाठी महिलेला विवस्त्र करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 04:10 IST

अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह तिच्या पतीला नग्न करुन मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

अहमदनगर : अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह तिच्या पतीला नग्न करुन मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. नातेवाईकांसह पोलीस अधिकाऱ्यानेही अत्याचार केल्याची या महिलेची तक्रार आहे.पाथर्डी तालुक्यातील या महिलेच्या पतीने विरोधात निवडणूक लढवली म्हणून त्याला त्रास देऊन त्याच्या विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तिच्या पतीला अटक झाली. या महिलेने पतीला सोडविण्यासाठी अनेकांकडे मदत मागितली. त्यावेळी पोलिसासह, नातेवाईकांनी अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप आहे. २०१६ मध्ये सदर महिलेले तोफखाना पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन सहा जणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. याच गुन्ह्यातील फिर्याद मागे घेण्यासाठी तिला व पतीला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली, असा आरोप आहे.पीडित महिला २४ जानेवारीला आपल्या पतीच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आली होती. रुग्णालयातून पतीसह बाहेर पडल्यानंतर घरी जाण्यासाठी हे पती-पत्नी रिक्षात बसले. रिक्षात अगोदरच एक इसम होता. त्याने गुंगीचे औषध देऊन आपणासह पतीला अज्ञात स्थळी नेले. तेथे नग्न करुन मारहाण करण्यात आली. अंगावर पेट्रोल टाकण्यात आले, असा दावा या महिलेने माध्यमांशी बोलताना केला आहे. महिलेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची दखल घेत पोलिसांनी महिलेची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.>अत्याचार पीडित महिलेचा जबाब नोंदविण्यात येत असून याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.- संदीप मिटके, पोलीस उपअधीक्षक>पीडित महिला मदतीसाठी स्रेहालयच्या न्यायाधार प्रकल्पाकडे आली होती. पतीला जाणीवपूर्वक अटक करण्यात आली व त्यानंतर आपला छळ करण्यात आला, अशी तक्रार तिने केली होती. आम्हीही या घटनेचा तपास करत होतो. कालांतराने ही महिला संस्थेतून बाहेर पडली व पुन्हा आली नाही.- शाम असावा, स्रेहालय कार्यकर्ते